AO3 News

Post Header

Published:
2020-04-04 13:19:02 UTC
Original:
Emergency measures affecting works
Tags:

The Archive of Our Own- AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) च्या रहदारी मध्ये मार्च महिन्यात सुस्पष्ट वाढ झाली आहे, आठवड्याचे पृष्ठ दर्शन दोनच आठवड्यात २६.२ कोटी वरून २९.८ कोटींवर वाढले आहेत. आम्हाला हा झोक असाच राहिल असे अपेक्षित आहे, व या दरम्यान वेबसाईट सुरळीत कार्यरत ठेवण्यासाठी, आम्हाला आणिबाणीचे उपाय करावे लागत आहेत. सर्वात दृत व उपयुक्त बदल आम्ही करू शकतो तो म्हणजे logged-out(जाणाची नोंद केलेल्या) वापरकर्तांना आमच्या सेवेतील कार्यांचे कॅशिंग करणे. दूर्दैवाने, याचा अर्थ असा की logged out वापरकर्त्यांना अद्यतनित कार्यांच्या घोषणेमध्ये, व logged out वापरकर्त्यांकडून येणाऱ्या hits(पानटिचक्या) या कार्याच्या एकूण hits मध्ये धरल्या न जाणे, हे विनाविलंब प्रारंभित होईल.

हे असे घडण्याचे कारण काय?

वाढलेली रहदारी आमच्या डेटाबेस मुख्य-संगणकांवर, ज्यांना दरवेळी कोणीतरी कार्य अपलोड केल्यावर डझनभर विनंत्या येतात, अतिरिक्त ताण देत आहे. (आम्ही ताणाच्या वेळी मदत म्हणून नवीन हार्डवेअर घेण्याची योजना केली आहे, पण आम्हाला चालू असलेली मुख्य-संगणक देखभाल संपवणे व कुठले हार्डवेअर मागवायचे हे पहिल्यांदा ठरवणे याची गरज वाटते. नवीन मुख्य-संगणकाचे वितरण येणे व त्याची स्थापना होणे यांकरिता काही महिन्यांचा कालावधी लागतो, व महामारीमुळे अनपेक्षित विलंब होऊ शकतो.)

Logged-out वापरकर्त्यांना कॅशे केलेल्या प्रतींची सेवा दिल्यामुळे, आम्ही करत असलेल्या डेटाबेस विनंत्यांचा आकडा अत्यंत कमी होईल. कॅशिंग म्हणजे, कोणी विशिष्ट पृष्ठाला भेट दिल्यास, दिलेल्या वेळामध्ये आम्हाला डेटाबेसला दरवेळी नवीनतम माहिती विचारावी लागत नाही. त्याऐवजी, आमच्या प्रातिनिधिक मुख्य-संगणकांपैकी एक सर्वांना पृष्ठाची हुबेहूब सारखी प्रत दाखवतो. साधारण एका तासानंतर ही प्रत अद्यतनीत होते.

मला काय बदल जाणवतील?

तुम्हाला ताबडतोब खालील बदल जाणवतील:

  1. जेव्हा पुढचा अध्याय पोस्ट होईल, logged out वापरकर्ते तो फक्त थेट दुवे मध्ये प्रवेश करून बघू शकतील जोपर्यंत कॅशे अद्यतनीत होत नाही, जे साधारण दर ६० मिनिटांनी होईल. कार्यांचे इतर बदल(उदा., कार्य-निर्मात्यांनी केलेले बदल किंवा मिळालेल्या नवीन प्रतिक्रिया वाटाळ्या) सुद्धा कदाचित logged out वापरकर्त्यांना कॅशे अद्यतनीत झाल्या शिवाय दिसणार नाहीत.
  2. कार्य-पृष्ठ सर्व logged out वापरकर्त्यांसाठी तंतोतंत जुळण्याची गरज असल्यामुळे, आम्हाला पाहुण्यांचे नाव व ई-मेल प्रतिक्रिया फाॅर्म मध्ये आपोआप भरले जाणे थांबवावे लागले आहे. (आपण आमंत्रणाची विनंती करा खाते निर्माण करू शकता जर फाॅर्मनी तुम्हाला लक्षात ठेवणे हवे असेल!)
  3. Log out केलेले वापरकर्ते सज्ञान वाचकांसाठी, विशिष्ट वाचकांसाठी किंवा अगुणांकित रेट केलेल्या प्रत्येक कार्यावरील प्रौढ सामग्री चेतावणी पाहतील हे तात्पुरते आहे व लवकरात लवकर दुरूस्त केले जाईल.
  4. Logged out वापरकर्त्यांचे नवीन पानटिचक्या कार्याच्या एकूण पानटिचक्या मध्ये सामिल केले जाणार नाहीत. (विद्यमान पानटिचक्या जाणार नाहीत) जो कोड पानटिचक्या वाढवतो तो आमच्या application(अनुप्रयोग) मुख्य-संगणकावर आहे, व म्हणून प्रातिनिधीक मुख्य-संगणक कॅशे केलेल्या प्रती वाटत असताना तो चालणार नाही.

पानटिचक्या चे गणना निश्चित केली जाईल का?

आम्ही पर्याय शोधत आहोत जे आम्हाला logged out वापरकर्त्यांची पानटिचक्या मोजणी परत सुरू करण्यास मदत करतील, पण दीर्घकालीन उपाय शोधण्यास व त्याची अंमलबजावणी करण्यास थोडा वेळ लागू शकतो. आम्ही शक्य तेवढे लवकर काम करू, पण आम्ही तुमच्याकडून संयमाची मागणी करत आहोत — आमच्या स्वयंसेवकांना, या तणावपूर्वक काळात, अधिक कामगिरी सुधारणेवर किंवा त्यांच्या आरोग्यावर प्राधान्य द्यावयास लागू शकते.

आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या सुधार किंवा पीछेहाट विषयी इथे AO3 बातम्या वर आणि @AO3_स्थिती ट्विटर फीड वर अद्यतनीत करत राहू.