Post Header
फेब्रुवारी १५ यायला आता थोडेच दिवस राहिले, म्हणजे ११वा वार्षिक आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस खूप जवळ आला आहे! #IFD2025 साठी आम्ही जगभरातल्या रसिकांकर्ता भरपूर उपक्रम आयोजित केले आहेत. आज त्या उपक्रमांबद्दल ऐका आणि आपल्याला कोणत्या उपक्रमात भाग घेता येईल ते जाणून घ्या!
- प्रतिक्रिया उत्सव: दर वर्षीप्रमाणे आम्ही प्रतिक्रिया उत्सव आयोजित केला आहे! आपल्या रसिकगटाबद्दलच्या आवडत्या कथा, कथेतले प्रभाव किंवा रसिकगट परीसंस्थेवर मोठा परिणाम केलेल्या गोष्टी या सगल्याबद्दल इतरांना सांगायची हीच आपली संधि आहे! फेब्रुवारी १३ ला आमच्या प्रतिक्रिया उत्सव पोस्टची वाट बघा आणि मग १० रसिकगट गोष्टींची शिफारस करा. सोशल मीडियावर पोस्ट करताना #FeedbackFest टाचणखूण वापरा.
- #IFD2025 किंवा #IFDChallenge2025 टाचणखुणा वापरुन, रसिकगट परिसंस्था म्हणून कसे काम करतात याचे अनुभव सोशल मीडियावर सांगा !
- Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर रसिकसमाजाबद्दलच्या कथांसाठी आमची International Fanworks Day 2025 (आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस) टाचणखूण वापरा !
- सगळी मज्जा फक्त AO3वर नाहीये: फॅन लोर, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ)चा रसिक इतिहास आणि संस्कृतीचा ज्ञानकोश, सुद्धा साजरा करणार आहे! हे आव्हान फेब्रुवारी १० ते १६ चालेल आणि रोज एक नवीन संपादकीय चुनौती असेल. भाग घेण्यासाठी a href="https://fanlore.org/wiki/Help:IFD_Fanlore_Challenge">IFD 2025 Fanlore Challenge पृष्ठावर (इंग्रजी मधे) अधिक माहिती मिळवा.
- खेळ आणि रसिक चॅट: फेब्रुवारी १५ला, आम्ही OTWच्या डिस्कोऱ्ड वर एक चॅट सादर करणार आहोत. फेब्रुवारी १४ रात्री ९ वाजता (यूटीसी वेळेप्रमाणे) (म्हणजे माझ्याकडे किती वाजता?) ते फेब्रुवारी १६ सकाळचे ३ (यूटीसी वेळेप्रमाणे) (म्हणजे माझ्याकडे किती वाजता?) इतर रसिकांबरोबर प्रश्नांचे खेळ खेळायला आणि गप्पा मारायला हजर रहा! चॅटरूम इंग्रजीत नियंत्रित केली जाईल आणि आम्ही फेब्रुवारी १५ला वेळपत्रिका देऊ.
रसिकसंस्कृतीत वर्षभर सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद! चला भेटूया #IFD2025ला!
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.